जनतेज न्युज

संगमनेरमधील उंबरी बळापुर येथे गावकऱ्यांचा ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा

प्रतिनिधी, अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर येथील गावकऱ्यांचा ग्रामपंचायत हंडा मोर्चा संगणमेर तालुक्यातील सर्वात बागायत पट्टा म्हणून समजला जाणाऱ्या शिवाय दोन पावलावर प्रवरा नदी  तर दुसऱ्या बाजूला प्रवरेचा कॅनल गेल्याचे बघायला मिळत आहे अशा उमरी बाळापुर ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना स्थानिक ग्रामस्थांना करावा लागत आहे.स्थानिक ग्रामपंचायतचा ढिसाळ कारभार गावावर पाणीटंच भीषण संकट आणि  ऐन पावसाळ्यात बघायला मिळत आहे.यामुळे मोल मजुरी करणाऱ्या महिला वर्गांनी आज ग्रामपंचायत वर हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायतचा निषेध केला यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील महिला वर्ग मोठ्या संख्येने होंडा मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संगणमेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके  ,अडकेट रवी शेळके , एकलव्य संघटना तालुका अध्यक्ष अनिल बर्डे यांचे नेतृत्व करण्यात आले या आंदोलनामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शक ग्रामपंचायत ढिसाळ कारभार विषयी निषेध व्यक्त केला आहे ग्रामपंचायत रात्री अराञी नळाला पाणी सोडते असल्यामुळे  बागायत पट्टा असल्यामुळे वाघांची भीती शिवाय जे काही नळाला पाणी येत आहे त्यामध्ये जंतू व दूषित पाणी असल्यामुळे रोगरायचे संकट दिवसेंदिवस गावात वाढत चाललंय असाही आरोप ग्रामस्थांनी केला.स्थानिक गरजा पूर्ण करण्यास उंबरी बाळापुर ग्रामपंचायत पूर्णपणे असक्षम बनत चालले आहे असा या आरोप महिला वर्गांनी केला आहे गावातील लाईट  ,पाणी  ,रस्ते  , ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास उबरी बाळापुर ग्रामपंचायत असक्षम बनत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे