जनतेज न्युज

सचिन वाझें दर महिन्याला मातोश्री वर महिन्याला 100 कोटी रुपये पाठवायचा – खा. प्रतापराव जाधव

प्रतिनिधी, बुलडाणा : राज्यात नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून हजर झाले. यावेळी शिवसेना खासदार आणि आमदार यांनी मेहकर मध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांच शहरातून रॅली काढत जोरदार स्वागत केलंय. यावेळी आयोजित हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमात मात्र शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मातोश्रीवरच गंभीर आरोप केलेत. 50 खोके एकदम ओके म्हणताना “शंभर खोके मातोश्री ओके” तेही दर महिन्याला जात असत, सचिन वाजे पैसे जमा करून मातोश्री वर पाठवात होता.. त्यातील अनिल देशमुख आणि वाझहे कुठे आहेत , असं म्हणत थेट उद्धव ठाकरेवरच गंभीर स्वरूपाचा आरोप केलय. आणि मातोश्रीला दर महिन्याला शंभर खोके जात असल्याचा खळबळजनक दावा, बुलढाणा खासदार खासदार प्रतापराव जाधव यांनी करून एकच खळबळ माजवून दिलीय.. त्यामुळे या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापतय का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आतापर्यंत शिंदे गटातील आमदारांना 50 खोके एकदम ओके, म्हणून हिणवल्या जायचं. मात्र आता शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी थेट मातोश्रीलाच “शंभर खोके एकदम ओके” तेही दर महिन्याला म्हणून आव्हान दिलय.