प्रतिनिधी, अहमदनगर : उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्याचे पूजन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले आहे. हा संगमनेर तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन आमदार थोरात यांनी केले आहे. पिंपळगाव कोंझिरा येथील बोगद्यालगत संगमनेर तालुक्यात आलेल्या निळवंडेच्या पाण्याचे मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी या धरणाचे व कालव्यांचे जनक आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्री थोरात, ॲड. माधव कानवडे, बाबासाहेब ओहोळ ,रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, मिलिंद कानवडे ,संतोष हासे, विश्वास मुर्तडक, उत्तमराव घोरपडे,आदींसह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
