जनतेज न्युज

सहा लाखांचा सुगंधित गुटखा जप्त; दोघांना अटक करून यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी, यवतमाळ : वाहनासह सुगंधित गुटखासाठा जप्त करून दोघांना अटक करण्यात आली.  घाटंजी रोडवरील पांढरी गावाजवळ करण्यात आलेल्या कारवाईत एकूण सहा लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मनिष राजकुमार हेमनानी (वय 34), नितीन प्रकाश हेमनानी (वय 26, दोघेही रा. पळसवाडी सिंधी कॅम्प) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. घाटंजी येथून यवतमाळकडे सुंगधित गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून यवतमाळ वाहतूक उपशाखेच्या पथकाने घाटंजी रोडवरील पांढरी गावानजीक नाकाबंदी केली. यावेळी  वाहन येत असताना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता त्यात एकूण एक लाख 44 हजारांचा गुटखा आढळून आला.  दोघांवरही यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला.