प्रतिनिधी, संभाजीनगर : शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृतीहून उद्यानामध्ये आज मनपातर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती होती. संपूर्ण देशामध्ये पर्यावरण दिनानिमित्त हरितक्रांती आणावी, असा उद्देश ठेवून आज सगळीकडे वृक्षरोपण केले जात आहे. त्यातलाच एक भाग म्हणून या उद्यानामध्ये आज झाडे लावण्याचा संकल्प केला. मला नक्कीच खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये या शहरात चांगल्या प्रकारचे पर्यावरण प्रदूषण मुक्त शहर व्हावे याकरता ही झाडे लावण्यात आली आहे. सर्वांनी असेच समाजोपयोगी उपक्रम हाती घ्यावेत, अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री अतुल सावी यांनी दिली.
