जनतेज न्युज

संभाजीनगरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस प्राशासन सज्ज

प्रतिनिधी, संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून योग्य ती खबरदारी शहर पोलिसांनी घेतली असल्याचं पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितले आहे. इतर शहराच्या तुलनेत सेन्सिटिव्ह शहर म्हणून संभाजीनगरची ओळख आहे. त्यामुळे पोलीस अधिक लोकाभिमुख व्हावं यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.