प्रतिनिधी, बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात एका गावात हातपंपावर पाणी भरण्यासाठी आलेल्या अल्पवयीन कुमारीकेचा हात धरून घरात ओढत नेत तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरुन येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. लढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय मुलगी हातपंपावर पाणी भरण्यासाठी आली असता गणेश उर्फ ज्ञानेश्वर तुकाराम तायडे (२३) याने सदर मुलीचा हात धरून घरात ओढत नेले. त्याचवेळी घरात अरुण पांडुरंग तायडे (२४) व अर्जुन दत्तु तायडे (२३) सर्व रा ता. जळगांव जामोद हे उपस्थित होते. या तिघांनीही संगनमत करून घराचा दरवाजा बंद केला व सदर मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. आणि याबाबत कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या तिघांनीही सतत दोन वर्ष वेळोवेळी पीडितेवर बलात्कार केला. दरम्यान सदर तिने आईला सांगितली. त्यामुळे सदर मुलीच्या आईने तिच्यासह जळगांव जामोद पोस्टे गाठून या घटनेची तक्रार दिली. या तक्रारीवरून जळगांव जामोद पोलिसांनी या तिनही आरोपीविरुद्ध बलात्कार तसेच पोस्को अंर्तगत गुन्हा दाखल केला. सदर पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपी तिघांनाही अटक करण्यात आली होती. तर १ मे २०१७ रोजी सदर पीडितेने शासकीय रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. दरम्यान पोलिसांनी आरोपी तसेच नवजात शिशू आणि पीडितेच्या डी. एन. ए. चाचणीसाठी रक्त नमुने घेतल्यावर पीडित व नवजात शिशु यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तपासाअंती हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावनी खामगांव जिल्हा सत्र न्यायालयात झाली.या मध्ये ११ साक्षीदारांचे बयान घेण्यांत आले असता यामध्ये सदरचा आरोप सिध्द झाल्याने आरोपी अर्जुन तायडे, गणेश तायडे, अरुण तायडे यांना कलम ३७६ मध्ये मरेपर्यंत (आजन्म कारावास आणि प्रत्येकास २० हजार रुपये दंड ठोठावला आहे.
