जनतेज न्युज

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याने घेतले विष ; प्रकृती चिंताजनक

प्रतिनिधी, अमरावती : अमरावती च्या जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारच्या सुमारास एका शेतकऱ्याने विष प्राषण करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधीत इसमाने विष प्राषण केल्याचे तेथे उपस्थित कर्मचार्यांच्या लक्षात येताच त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. माहिती नुसार चांदुरबाजार तालुक्यातील पिंपळपुरा गावातील रहिवासी असलेले रमेश तंतरपाळे यांच्या स्थानिक प्रशासनासोबत जागेचा वाद सुरु आहे. त्यांच्याकडे इंग्रजकाळातील वतनाची जागा बक्षीसपत्रस्वरुपात मिळाल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे मालकिहक्काची जागा मोजणी करुन द्यावी,अशी मागणी तंतरपाळे यांनी चांदुरबाजार नप आणि तहसिल कार्यालयाकडे केली होती. तेथे समाधान न झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते जिल्हा प्रशासनाकडे न्याय मागत होते. मात्र निवेदन, अर्ज करुनही प्रशासन दखल घेत नसल्याचे पाहून हताश झालेल्या रमेश तंतरपाळे यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातच विष प्राषण करुन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. विष प्राषण केल्यानंतर ते एका अधिकाऱ्याच्या कक्षात बसले होते, दरम्यान वेळीच तेथील कर्मचार्यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे रमेश तंतरपाळे यांना आयसीयुमध्ये  ठेवण्यात आले असून मृत्यूशी त्यांची झुंज सुरु आहे.