जनतेज न्युज

सापाच्या गळ्यात फसला माशाचा गळ; वन्यजीवप्रेमींमुळे बचावला सापाचा जीव

प्रतिनिधी, सोलापूर : पावसामुळे सर्वत्र नाले, तलाव तुडुंब भरले आहेत. यामुळे हौसी मुले गळ लावून मासे पकडू लागले आहेत. अक्कलकोटजवळील तलावात असाच प्रकार सुरू असताना गळाला चक्क माश्या ऐवजी ‘पानधिवड’ जातीचा साप लागला अन् तो जखमी झाला.गळ सापाच्या खोलवर गळ्यात घुसल्याने सापाला मोठी जखम झाली. हीच बाब लक्षात घेऊन वन्यजीव प्रेमींनी पुढील उपचारासाठी सापाला सोलापुरात आणले,डॉ. अनिकेत नावकर यांनी सापाला भूल देऊन त्याच्या गळ्यात खोलवर अडकलेला गळ काढला आणि दोन दिवस वैद्यकीय निरीक्षणात ठेवल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.