प्रतिनिधी, धाराशिव : मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले असुन वेळकाढूपणा करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ तसेच मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आमदारांना अटक केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संचारबंदी शिथील झाली नसतानाही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले आहे.
