जनतेज न्युज

शासनाकडून जनावरांसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांची होत आहे तिप्पट किंमतीत विक्री

प्रतिनिधी, धुळे : पावसाळ्यामध्ये जनावरांना उद्‌भवणाऱ्या विविध आजारांसंदर्भात शासना कडून दिली जाणारी औषधे ही धुळ्यातील एका खाजगी औषधांच्या दुकानामध्ये आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकरणा संदर्भात आता महाराष्ट्र ठेलारी महासंघ चांगलाच आक्रमक झाला असून संबंधित मेडिकल व त्या मेडिकलला औषध साठा पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. पावसाळ्यामध्ये जनावरांच्या पोटात होणारे जंत यावर प्रतिकारक औषध म्हणून प्रशासनातर्फे शासकीय लसीकरण केंद्रांवर औषधी दिली जाते, परंतू ही औषधी खासगी दुकानामध्येण आढळली. सदर औषध हे सर्रासपणे खाजगी औषधांच्या दुकानांमध्ये मिळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र ठेलारी महासंघ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनवून या दुकानात या औषधाच्या बाटलीची मागणी केली असता त्या ठिकाणी सहजपणे हे औषध मिळून आले. या सर्व घटनेचे स्टिंग ऑपरेशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. जी औषधे शासनाकडून केवळ 75 रुपयांना मिळते तेच औषध या खासगी मेडिकल मध्ये 300 रुपयांना विक्री होत असल्याचं वास्तव समोर आल आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी करीत संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी आणि अवैध्य पणे औषध विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात धुळ्यातील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना याबाबतची लेखी तक्रार केली असता त्यांनी या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊन संबंधित औषध दुकान मालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावर महाराष्ट्र ठेलारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत संबंधित दुकान मालकावर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा मुद्दा लावून धरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.