प्रतिनिधी, नंदुरबार : गणेश उत्सव काळामध्ये पारंपारिक वाद्यांना महत्त्व देत डीजे डॉल्बी याला महत्त्व न देत नंदुरबार जिल्हा डीजे मुक्त करण्यासंदर्भात पोलीस प्रशासनातर्फे संकल्पना राबवण्यात आली होती. त्या संकल्पनेला नंदुरबार जिल्ह्यातील सर्व डीजे डॉल्बी धारकांनी प्रतिसाद देत गणपती उत्सव काळात कुठेही डीजे वाजवणार नाही असा संकल्प केला. त्यानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांच्या सत्कार करण्यात येऊन सन्मान करण्यात आला. डीजे मुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे डीजे डॉल्बी धारकांना विनंती करण्यात येऊन डीजे डॉल्बी मुळे कशाप्रकारे ध्वनी प्रदूषण होऊन नुकसान होते असे समजावण्यात आले . त्या संकल्पनेला प्रतिसाद भेटत सर्व डीजे धारकांनी स्वतः आज जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या उपस्थितीत सर्व डीजे पोलीस मैदान लावण्यात आले . नंदुरबार जिल्हा हा डीजे डॉल्बी मुक्त करण्याच्या संकल्प केला होता त्यास डीजे मालकांनी चांगला प्रतिसाद दिला .डीजे मालकांनी कशाप्रकारे जिल्हा ध्वनी प्रदूषण मुक्त होईल याचे महत्व समजून जिल्हा पोलीस दलाला सहकार्य केले आहे यापुढे गणेशोत्सव काळात डीजे न लावता पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन द्यावे असे जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , शहर पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर, पोलीस निरीक्षक राहुल पवार, यांच्या सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
