जनतेज न्युज

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची चौकशी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री यांना पत्र – धर्मपाल मेश्राम, प्रवक्ता भाजपा

प्रतिनिधी, नागपुर : राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी हे कमिशन खोरी केल्याशिवाय आमदार निधी वाटप करत नाही अश्या बातम्या येत आहे.या आधारे भाजपा प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या संदर्भातील चौकशी करण्याची विनंती केली आहे. अश्या प्रकारच्या गैरव्यवहार होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा वर कार्यवाही झाली पाहिजे अशे मत धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले.
गृहमंत्री अमित शहा हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत. या देशाचे ते पहिले सहकार मंत्री देखील आहेत. अमित शाह यांनी शासकीय आणि राजकीय दौरे करणे अपेक्षित आहे. ते आमचे मार्गदर्शक देखील आहेत. भारतीय जनता पक्षाला त्यांच मार्गदर्शन अनेकवेळी लाभलेला आहे. अमित शहा यांच्या दौऱ्या वर मुख्यमंत्री शिंदे साहेब बोलले आहे. आणि त्यामुळे ह्या विषयावर नव्याने काही बोलणे हे संयुक्तिक होणार नाही परंतु ह्या ज्या भेटी आहेत त्या सगळ्या सौजन्य भेटी आहेत. महाराष्ट्रात गणेश उत्सवा मुळे अत्यंत उत्साहाच वातावरण आहे.महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षा नंतर भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार अरुट झालेला आहे. आणि ह्या उत्साहपूर्ण वातावरणात अमित शहा यांनी भेटी देणे. आणि मार्गदर्शन करणे हेच अपेक्षित आहे. आणि त्याच प्रकारे त्यांचा दौरा असावा अशी शक्यता आहे.