जनतेज न्युज

सायबर गुन्हेगारांवर पुणे पोलिस आयुक्तांची मोका कारवाई

प्रतिनिधी , पुणे : नागरिकांना लोण ॲपद्वारे लुबाडणाऱ्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोका कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांवर पहिल्यांदाच अशी मोका कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे दावा पोलिस आयुक्त आमिताभ गुप्ता केला आहे. या टोळीत सहभागी असणारे हे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित असून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईत मुख्य आरोपी हा धीरज भारत पुणेकर (वय ३६), स्वप्नील हनुमत नागटिळक ( वय २९). श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड (वय २६) प्रमोद जेम्स रणसिंग (वय ४३). सॅम्युअल संपत कुमार (वय ४०) सय्यद अकिब पाशा ( वय २३). मुबारक अफरोज बेग ( वय २२ ) मुजीब बरांद कंदियल पिता इब्राहिम ( वय ४२) मोहम्मद मनियत पिता मोहिदु (वय ३२) अशी कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. पुणेकर व त्याच्या टोळीतील इतर आठ साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.