जनतेज न्युज

शाळकरी चिमुकल्यांनी अनुभवली विठ्ठलाची वारी

प्रतिनिधी , सोलापूर  : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील सुयश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पंढरीची वारी विठ्ठलाच्या दारी हा उपक्रम राबवला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी तसेच वारकऱ्यांची वेशभूषा धारण करून हरिनामाचा गजर करत शाळेपासून ते कृष्णा मंदिरा पर्यंत पालखी मिरवणूक काढून आनंद लुटला आहे.