प्रतिनिधी , सांगली : सांगलीमध्ये श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याच्या जनजागृतीसाठी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हत्ती घोडे उंट यांचा सहभाग लक्षवेधी ठरला . 4 जानेवारी ते 14 जानेवारी या दरम्यान सांगली मधील नेमिनाथ नगर येथे श्रीराम कथा व कीर्तन सोहळा होत आहे . चार जानेवारीला या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. आज या सोहळ्याच्या जागृतीसाठी सांगलीतील श्री राम मंदिर येथून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली . या पदयात्रेत बाल वारकरी सर्वांचं लक्ष वेधून घेत होते तर शालेय विद्यार्थी लेझीमच्या तालावर ठेका धरताना पाहायला मिळाले . याचबरोबर माहेश्वरी समाजाकडून दांडिया खेळही सादर करण्यात आले . तसेच आकर्षक ढोल पथक शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. सोहळ्याचे निमंत्रक मनोहर सारडा यांनी या संपूर्ण सोहळ्याचा आयोजन केले आहे. 14 जानेवारीपर्यंत हा सोहळा संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात दररोज सायंकाळी श्री राम कथा ही मराठीत वाचली जाणार आहे . त्यामुळे या सोहळ्याला तमाम मराठी बांधव हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.
