जनतेज न्युज

अहमनगरच्या अकोलेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी भव्य मोर्चा

प्रतिनिधी , अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आज रिपब्लिकन पक्षांचे विविध गटांनी एकत्र येत भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारकाच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हे अतिक्रमण काढण्यात येऊन स्मारकासाठी ती जागा मोकळी करावी यासाठी आरपीआयचे विविध गट तट एकत्र येत त्यांनी आज भव्य दिव्य असा मोर्चा काढत स्मारकाची अवतीभोवतीच्या अतिक्रमण काढावे अशी बागणी नगरपंचायतेकडे केली आहे.