प्रतिनिधी , मुंबई : महाराष्ट्र पोलिसांच्या जीवनावर आधारित ott प्लॅटफॉर्मवर 2020 रोजी class of 83 हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाची कथा पोलीस भरती ट्रेनिंग, कॅम्पस, हॉटेल वस्तीगृह पासून चालू होते. दरम्यान सुरुवाती पासून ते शेवटपर्यंत चित्रपटात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर कर्तव्यदक्ष असणारे महाराष्ट्र पोलिसाबाबत अश्लील चित्रीकरण करून निर्माता दिग्दर्शक यांनी महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही बाब निंदनीय आहे. महामारी मध्ये लॉकडाऊन वेळी एकीकडे महाराष्ट्र पोलीस आपले कर्तव्य पार पडत होते कायदा सुव्यवस्था दाखवत होते कोणाबाबत प्रबोधन करत होते तर दुसरीकडे याचवेळी रेड चिली प्रोडक्शन हाऊस चे क्लास class of 83 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला. एकीकडे आपले कर्तव्य पार पडलेल्या पोलिसांचं कोरोना योद्धा म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी प्रशंसा केली होती तर दुसरीकडे class of 83 या चित्रपटातील महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली यातून चित्रपट निर्माता दिग्दर्शक यांना समाजात पोलिसांची कोणती प्रतिमा लोकांसमोर दर्शवायची आहे चित्रपट माध्यमातून नवीन पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या युवक युवतीला कोणता संदेश द्यायचा आहे. असा सवाल उपस्थित करीत शाहरुख खान गौरी खान गौरव वर्मा लेखक अभिजीत देशपांडे आणि अभिनेता भूपेंद्र जाधव यांच्यावरती कलम 124A, 295,292,294,कलम 499 अन्वये आयपिसी च्या कलम अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड कामगार संघटना चित्रपटा द्वारे करण्यात आली आहे.
