प्रतिनिधी , अहमदनगर : राज्यातील प्रमुख जिल्हापैका आता अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात गोवंश पशुधनात आढळणारा ‘लम्पी’ या आजाराने शिरकाव केला आहे. संगमनेर तालुक्यात गोवंशात तीनशे पेक्षा जास्त जनावरांना या आजाराची लागण झाल्याने पशुसंवर्धन विभाग आता ‘अलर्ट मोड’वर आला आहे.संगमनेर तालुक्यातील कोठे (बुद्रुक), आंबीखालसा आणि परीसराती गावांमध्येही सुमारे 80 गोवंशांना ‘लम्पी स्कीन’ची लागण झाली आहे. या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटरच्या परिघास बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. लागण झालेल्या केंद्रांच्या पाच किलोमीटरच्या परिघात सुमारे नऊ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये सुमारे साडेसहा हजार गोवंशातील जनावरे असून, या सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. आवश्यक त्याउपाययोजनांसोबतच लसीकरण आणि स्वच्छता मोहिमेवर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून भर दिला जात आहे.
