प्रतिनिधी, अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ तथा आशापीर बाबा देवस्थानचा यात्रोत्सव नुकताच जल्लोषात पार पडला.परिसरात विविध खेळण, प्रसाद व इतरही अनेक दुकाने यात्रोत्सवा निमित्ताने थाटली होती. यामुळे देवस्थान परिसरात प्रचंड कचरा साचला होता.हिच बाब हेरून संगमनेर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस पदाधिकारी,पारेगाव बुद्रुक गावचे सामाजिक कार्यकर्ते व तंटामुक्तीचे अध्यक्ष वकील त्रिंबक गडाख, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अय्याज कादरी,दौलतराव गडाख,यांच्या सहकार्याने अश्विनाथ गडावर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करण्यात आला .याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आय्याज कादरी,पारेगाव बुद्रुक तंटामुक्तीचे अध्यक्ष त्र्यंबक गडाख,दौलतराव गडाख,बाबा गडाख,कैलास गोर्डे, रावसाहेब गडाख आदींसह पोलीस बांधव पारेगाव ग्रामस्थ हया मोहिमेत सहभागी झाले होते.याप्रसंगी माजी उपसरपंच बाबा गडाख,सामाजिक कार्यकर्ते कैलास गोर्डे,रावसाहेब पोलस पठाण,पोलीस बाबासाहेब खेडकर,पोलीस अनिल जाधव,यांसह अनेक पोलीस बांधव यांचे परिसरात स्वच्छता मोहिमेत योगदान लाभले.पोलीस बांधवाच्या हया आगळा वेगळ्या प्रेरणादायी स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुकव अभिनंदन होताना दिसून येत आहे.
