जनतेज न्युज

पावसामुळे अक्कलकोट बस स्थानकाची दुर्दशा, बस स्टॅन्डची इमारत झाली जीर्ण

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापुरातील अक्कलकोटच्या बस स्थानकाची मोठी दुरावस्था झाली आहे.
बस स्टँडची मुख्य इमारत जीर्ण झाली असून धोकादायक बनली आहे.
तर पावसामुळे बस स्टँड परिसरात खड्डेच खड्डे पडले आहेत. 
स्वामी समर्थांची नगरी असलेल्या अक्कलकोट मध्ये दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र अक्कलकोटमध्ये दाखल होताचं त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे भाविकांमधून देखील नाराजीचा सूर उमटत आहे. 
बस स्टँड परिसरात पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वारंवार विचारणा करून देखील प्रशासनातर्फे कोणतीही दखल घेतली जात नाहीये.
जर प्रशासनाने या संदर्भात गंभीर्याने दखल घेतली नाही तर सर्वसामान्य लोकांना घेऊन रस्त्यावर उतरवू, असा इशारा आरपीआयचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी दिला.