जनतेज न्युज

मूर्तिकार सज्ज झाले गणेश उत्सवासाठी; मूर्तिकार मूर्ती बनविण्यात व्यस्त

प्रतिनिधी, वर्धा : कोरोनामुळे सलग दोन वर्षे गणेशोत्सवार निर्बंध लादण्यात आले होते. त्याचा फटका मूर्तिकारांना बसला होता. आता मात्र सर्व नियम हटविल्यामुळे मूर्तिकार मूर्ती बनविण्यात व्यस्त आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या तिसऱ्या लाटे संदर्भात राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. मात्र, याबाबतची नियमावली जाहीर होण्यास उशीर झाला होता. याचा फटका मूर्तिकारांना बसला होता. गणेशोत्सवाला एक महिना वेळ असला तरीही सार्वजनिक मंडळांसोबतच घरगुती गणेश मूर्ती घडविण्याची प्रक्रिया मूर्तिकारांकडून जोरदारपणे सुरू झाली आहे. परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती या दिसायला जर सुंदर आणि आकर्षक दिसतात आणि या मूर्तीचे रेट सुध्दा कमी असतात पण याचा फटका मात्र मूर्तिकारांना बसतो. प्रशासनाचे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालावी अशी यावेळी मूर्तिकार यांनी म्हटले आहे.