जनतेज न्युज

शेवटच्या श्रावण सोमवारी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूरचे ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात आज शेवटच्या श्रावण सोमवारची महापूजा मोठ्या भक्तीमय धार्मिक वातावरणात संपन्न झालीय.
शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त सकाळपासूनच भाविकांनी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात. सिद्धेश्वर महाराजांच्या योग समाधीला फुलांची सुंदर आणि आकर्षक अशी आरास करण्यात येते.
शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त संपूर्ण सिद्धेश्वर मंदिरात एक धार्मिक वातावरण बघायला मिळत आहे. पहाटेपासूनच अबाल वृद्ध दर्शनासाठी गर्दी करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षात मंदिरात नित्योपचार झाले असले तरी भाविकांना मज्जाव होता. त्यामुळे सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.