जनतेज न्युज

छत्रपती संभाजी राजे यांनी घेतली मेटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट

प्रतिनिधी ,  बीड :  छत्रपती संभाजी राजे यांनी दिवंगत विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान मेटे यांच्या बहिणीला छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढे अश्रूंचा बांध फुटला, आता मेटे साहेब आपल्यात नसले तरी मराठा आरक्षणाचा लढा तुमच्या माध्यमातून उभारा अशी विनवणी मेटे यांच्या बहिणीने संभाजी राजे यांच्या कडे केली आहे. मागील आठवडाभरापूर्वी विनायक मेटे यांच अपघाती निधन झालं. या निधनानंतर बीड सह राज्यभरात हळहळ व्यक्त केली जाते.