जनतेज न्युज

राज्यातल सर्वोच्च पद सोडून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा स्विकार त्यांनी केला- चंद्रशेखर बावनकुळे

प्रतिनिधी , बुलडाणा : आपण सर्वांनी अभिमान देवेंद्र फडणवीस यांचा केला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री पद सोडून आपली संघटना मजबूत करण्याकरिता..राज्यात समाज सेवेकरता राज्यातल सर्वोच्च पद सोडून उपमुख्यमंत्री पदाचा स्विकार त्यांनी केला.खर्या अर्थाने आदर्श आपल्या पुढे केला. हा आदर्श कशा करता केला. आपल्या करता आपल्या कार्यकर्त्यां करता केला. ते आपल्या कार्यकर्त्यां करता लढत आहे.उद्या जर हे सरकार आले नाही तर ते अडीच वर्षे खाऊन टाकतील. इतके मस्तावले होते. हे सरकार गेले नसते. तर गरिबां वर अन्याय झाला नसता. तो वेळ नाही सांगायचा मला.अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा पदाधिकारी बैठकीत कार्यकर्त्यांना दिली आहे.ते आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात ते उपस्थित झाले होते.