प्रतिनिधी, औरंगाबाद : जिद्द, चिकाटी, दीर्घउद्योग,आणि त्याला आत्मविश्वासाची जोड देत शिक्षणासोबतच ट्रेकिंग क्षेत्रात पदार्पण केलेल्या छत्रपती संभाजीनगर सिडको वाळूज महानगर येथील युवती योगेश्वरी बाबुलाल बोहरे हिने आपल्या साहासातून जगातील सर्वोच्च उंचीचे शिखरं पदाक्रांत करीत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे योगेश्वरी बोहरे हिने 24/08/2021 ला अफ्रिका खंडातील उंच शिखर किलीमंजारो सर केले होते या वर्षी पुन्हा ट्रेकिंग च्या मोहिमेत सहभागी होऊन 24/08/2022 ला योगेश्वरी बोहरे या तरुणीने युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस ५६४२ मिटर उंचीचे मायनस 25 डिग्री सेल्सियस वातावरणात गिर्यारोहन करत सर केल्याने पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवाला आहे.
