प्रतिनिधी , औरंगाबाद : पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी गावांमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा अंदाधुंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकणवाडी गावातील कार्यरत असणारे शिक्षक व शिक्षिका आंधळे यांच्यावर सतत गैरहजर राहणे शाळेत वेळेवर न येणे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार न देणे तसेच गुणवत्ता पूर्ण शिक्षण न देणे या आरोपाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद ठेवत व विद्यार्थ्यांना शाळेबाहेर बसवत आंदोलन केले व आंधळे शिक्षक व शिक्षिका यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करत निलंबन करण्याची मागणी करत नवीन गुणवत्तापूर्ण शिक्षक नियुक्त करण्याची मागणी पालक सरपंच तसेच ग्रामस्थांनी केली.
