जनतेज न्युज

सिंदीच्या पोळ्याला तब्बल 140 वर्षांची परंपरा

प्रतिनिधी, वर्धा : वर्धाच्या सिंदी रेल्वे येथे मोठ्या उत्साहात परंपरेनुसार जल्लोषात तान्हा पोळा साजरा होतोय.विशेष म्हणजे सिंदी रेल्वेला इथल्या तान्हा पोळ्यामुळेच वेगळी ओळख आहे.जवळजवळ 140 वर्षांची परंपरा या पोळ्याला लाभली आहे. विदर्भात प्रसिद्ध असा तान्हापोळा सिंदी रेल्वे येथे भरतो. पाच ते सहा फुटांपर्यंतचे नंदी यामध्ये सहभागी होतात.गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने पोळा भरवावा लागला होता,त्यामुळे नागरिकांच्या मनात काहीशी नाराजीही होती, मात्र यावर्षी कुठलेही निर्बंध नाहीत, त्यामुळे मोठ्या उत्साहात येथील मानाच्या नंदींसह शेतकरी आपल्या घरचे असंख्य नंदी घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. डीजेच्या तालावर अनेक युवक डान्स करताना बघायला मिळत असून दोन वर्षांची कसर भरून काढत आहेत. खासदार रामदास तडस,आमदार समीर कुणावार, यांच्यासह इतर मान्यवर ज्या ठिकाणी उपस्थित होते. सर्व नंदी आपापल्या घरून निघून शहरात फिरून नंदी चौकात एकत्रित झाले आणि एक वेगळी रौनक सिंदीच्या बाजार परिसरात बघायला मिळाली आहे.शेवटी मान्यवारांच्या हस्ते मानाचेनंदी आणि सुंदर आकर्षक देखाव्यांना बक्षीस वितरण देखील करण्यात आले.रात्री साडेबारा वाजेपर्यंत कार्यक्रम संपन्न झाला.