जनतेज न्युज

शिर्डी साई संस्थानकडुन कोर्टाच्या आदेशाने अनुकंपा वारसांच्या नेमणूका

प्रतिनिधी, अहमदनगर : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या् वतीने शासन निर्णयास अधिन राहून सन २००९ ते माहे ऑगस्टश २०२० अखेरपर्यंत अनुकंपा प्रतिक्षा यादीवरील २६ पात्र उमेदवारांपैकी आज दिनांक १६ सप्टेंेबर २०२२ रोजी २१ पात्र उमेदवारांना संस्थालनच्या मुख्यन कार्यकारी अधिकारी भाग्य श्री बानायत यांच्यान हस्तेस नेमणूक आदेश देण्या०त आले. शासनाच्या दिनांक २७ ऑगस्ट, २०२० आदेशान्वभये श्री साईबाबा संस्थानाच्याय अनुकंपा तत्वावर नियुक्ती बाबत मान्यता दिलेली होती. त्याय मान्यतेस अधिन राहून सन २००९ ते माहे ऑगस्ट, २०२० या कालावधीत स्थातयी पदावरील मयत झालेल्या कर्मचा-यांचे प्रतिक्षायादीतील पात्र होत असलेल्या् अनुकंपा वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार गट क व गट ड चे रिक्त् पदावर एकत्रित मानधनावर नेमणूका देणेबाबतचा संस्थाान व्यावस्थाापन समितीचे दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजीचे सभेतील निर्णय क्रमांक ९२ च्या‍ निर्णयानुसार एकुण २६ पात्र अनुकंपा वारसांपैकी गट क पदांची ०८ व गट ड पदांची १३ अशी एकुण २१ अनुकंपा उमेदवारांना संस्था नच्याा मुख्या कार्यकारी अधिकारी भाग्यडश्री बानायत यांच्याए हस्तेअ नेमणूक आदेश देण्यायत आले. यावेळी श्रीमती बानायत यांनी सर्वांना शुभेच्छा देत, “आपण सर्व काम करतानी बाबांची सेवा समजुन काम कराल.” अशी आशा ही त्यांनी व्य्क्तछ केली.