प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूरकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सद्गुरू श्री प्रभाकर महाराजांचा 66 व्या पुण्यतिथी निमित्त सोमवारपासून अध्यात्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्री सद्गुरु प्रभाकर महाराजांच्या मंदिरात गुलालाची उधळण करण्यात आली. हजारो भक्त जणांच्या उपस्थितीत प्रभाकर महाराजांची आरती म्हणत गुलालाचा कार्यक्रम संपन्न झाला.सद्गुरु प्रभाकर महाराज मंदिरात तीन दिवस अध्यात्मिक कार्यक्रम होणार आहे. तामिळनाडू येथील वेल्लोरच्या गोल्डन टेम्पल च्या धरतीवर सम्राट चौकातील सद्गुरु श्री प्रभाकर महाराज मंदिराला सोनेरी दिव्यांची लाइटिंग करण्यात आलीय.या पुण्यतिथी उत्सवाशिवाय दर गुरुवारी आणि पौर्णिमेला मंदिर सोनेरी लाइटिंगने उजळून निघाले.
