जनतेज न्युज

सोयाबीन काढणीला वेग; भाव वाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी, बुलडाणा : गेल्या आठवड्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने मागील आठ दिवसांपासून उघड दिलीय. शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलेले सोयाबीन मळणी यंत्रातून काढण्यासाठी धडपड करीत आहेत..त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन काढणीच्या कामाला वेग आला आहे.बुलडाणा जिल्ह्यात 7 लाख 35 हेक्टरवर शेतकऱ्यांनी पीक पेरा केला होता. त्यापैकी 3 लाख 97 हजार हेक्टर वर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती.मात्र अति पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होत आहे ..त्यातच भावही मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.बुलडाणा तालुक्या तील हरिभाऊ गवळी यांनी अडीच एकर वर सोयाबीनची पेरणी केली होती.सुरवातीच्या काळात पिके चांगली होती..मात्र अति पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते.गत आठवड्यापासून पावसाने उघड दिल्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवरील मळणी यंत्राद्वारे सोयाबीन काढत आहे.. जोरदार पाऊस पडल्यामुळे त्यांना सोयाबीनच्या उत्पादनात गट झाली आहे. सध्या सोयाबीनला मिळत असलेल्या अतल्पभावामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत सध्या प्रतिक्विंटाला चार ते साडेचार हजार रुपये भाव मिळत आहे त्यात एकही होणाऱ्या उत्पन्नातही घट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळेच सोयाबीन ला योग्य भाव वाढ द्यावी आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.