जनतेज न्युज

शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देणं किंवा त्यांच्यासाठी मोठ्यास्वरूपात काम कारण हे सरकारच काम आहे – मकरंद अनासपुरे

प्रतिनिधी , औरंगाबाद : शहरातील कॅन्सर रुग्णालय येथे एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेता मकरंद अनासपुरे म्हणाले की,नाम फाउंडेशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक कार्य करण्यात आले मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी राज्य सरकारने मोठी पावले उचलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी आज रोजी माध्यमांकडे व्यक्त केले आहे.गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असून जगाचा पोशिंदा यालाच आत्महत्या कराव्या लागत असल्याने याकडे राज्य शासनाने गंभीर्याने घेऊन शेतकऱ्यांसाठी उपाययोजना कराव्या असे मकरंद अनासपुरे यांनी आज रोजी म्हटले आहे.शहरातील कॅन्सर रुग्णालय यांच्यासाठी आयोजित एका कार्यक्रमासाठी येथे आज रोजी शहरात आले असून यावेळी कॅन्सल रुग्णालयातील रुग्णांना भेटून त्यांनी विचारपूस केली आहे.