जनतेज न्युज

तरुणीची छेड छाड करुन डीलेव्हरी बॉय फरार

प्रतिनिधी, मुंबई : घरपोच खाद्यपदार्थ पोहचविणा-या एका कंपनीच्या डीलेव्हरी बॉयने खाद्यपदार्थ घरपोच केल्यावर रक्कम स्वीकारली. यावेळी घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत डिलिव्हरी बॉय ने तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीची छेड काढली आणि डिलिव्हरी बॉयने पळ काढला. पनवेल मधील कोन गावानजीक असलेल्या इंडीयाबुल्स या इमारतीमध्ये सदर घटना घडली आहे. विनयभंग झालेली तरुणी ही शिक्षण घेत असून तरुणीने तात्काळ घडलेल्या प्रसंगाची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात डिलिव्हरी बॉय विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोहम्मद रिजवान शेख असे या डिलिव्हरी बॉय चे नाव असून पोलीस या डिलिव्हरी बॉयचा कसून शोध घेत आहेत.