प्रतिनिधी, मुंबई : उरण द्रोणागिरी मधील CWC/CFS नोडचे प्रशासन बदलल्याने कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन प्रशासनासोबत कामगार नेते प्रशांत पाटील यांची मागील नोव्हेंबर महिन्यात मीटिंग झाली होती. मागील तीस वर्षांपासून याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना कायम केले जातील असा दावा नवीन प्रशासनाने लेखी आवेदन दिले होते. यावर कोणतीही कारवाई होत नाही आहे, म्हणून कामगार आणि नवीन प्रशासनासोबत अनेक मीटिंग झाल्या मात्र आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे कामगारांनी आपल्या बायका पोरांसह कंपनीच्या गेटवर धरणे आंदोलन केले, यावेळी गेटसमोर वातावरण चिघळणार म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करत येत्या सोमवारी कंपनी सोबत मीटिंगचे आयोजन केले आहे. यावेळी कामगार नेते प्रशांत पाटील यांनी कंपनी प्रशासनावर आरोप करत प्रकल्पग्रस्त कामगारांमध्ये भांडण लावण्याचे काम कंपनी प्रशासन करत आहे.आमच्यावर दबाव आणत नाहीत,मात्र जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तो पर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही, जर इथे बसून दिले नाही, तर आम्ही तहसील कार्यालयावर व अन्य ठिकाणी धरणे आंदोलन करू, मात्र कंपनी प्रशासनाला कामगारांना कामावर रुजू करण्यास भाग पडणारच असा इशारा यावेळी दिला गेला. तर आंदोलकांनीही, आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून, आम्ही रोज कंपनी समोर येऊन बसठाण मांडणारआहोत. आम्ही मागील तीस वर्षांपासून इथे काम करतो मग आता कुठे जाणार असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला.
