प्रतिनिधी , सातारा : साताऱ्यात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या थाटात झाले आहे.. सनई चौघाड्यांच्या निनादात पालखीतून गणेशाची वाजतगाजत मिरवणूक पोवई नाक्यावरील निवासस्थानापर्यंत काढण्यात आली.. यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.. राज्यवारील कोरोनाचे संकट दूर झाले आहे.. 2 वर्ष आर्थिक संकटात राज्य होते.. भाजप शिवसेना युतीचे वेगवान नेतृत्व हे राज्याला मिळाले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वायू वेगाने पळणारे नेते असून राज्यातील रखडलेले प्रकल्प वायुवेगाने पूर्ण करण्याची ताकद देण्याची प्रार्थना गणरायाला केली आहे..
