जनतेज न्युज

वडवणी तालुक्यातील पुसरा नदीला पूर; दहा गावांचा संपर्क तुटला

प्रतिनिधी, बीड : बीडच्या वडवणी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावलीय त्यामुळे पुसरा नदी खळखळून वाहू लागलीय. या नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास दहा गावांचा संपर्क तुटला आहे. पुसरा, तिगाव, चिंचाळा, माटेगाव यासह परिसरातील गावांचं दळणवळण ठप्प झाले आहे. आज आठवडी बाजार असल्याने नागरिकांना पुलावरून पाणी वाहत असल्याने बाजाराला जात आले नाही. पावसापूर्वीच गावातील ग्रामस्थांनी सदरील पुलाची दुरुस्ती अथवा नवीन पूल तयार करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत. तर पुलावरून पाणी वाहत असताना देखील काही वाहनधारक नसते धाडस करत आहेत.