प्रतिनिधी, संभाजीनगर : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये विविध भागांमध्ये झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन मनपा प्रशासकाने केले आहे. ते म्हणाले की, झाड लावताना असे झाड आपण लावावे ज्या झाडावर पक्षी घरटे करतील. फळांचे फुलांचे झाड आहे जे पशुपक्षींना उपयोगाचे ठरेल, असे झाडे लावावे. परदेशी झाड लावू नये आणि लावलेल्या झाडाचे संगोपन करावे आणि कुठेही आपल्याला वृक्षतोडायची गरज असल्यास त्याची परवानगी घ्यावी नसता त्यांच्यावर जास्तीत जास्त दंड आकारून गुन्हाही दाखल करण्यात येईल. यामुळे या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी मिळून पर्यावरण आणि स्वच्छता जोपासावी. अशी मी अपेक्षा बाळगतो, अशी प्रतिक्रिया मनपा प्रशासक आयुक्त जी श्रीकांत यांनी पर्यावरण दिनानिमित्त दिली आहे.
