जनतेज न्युज

विठू-रखुमाईचं मंदिर विद्युत रोषणाईने लखाखल

प्रतिनिधी, पंढपुर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणारे श्री विठ्ठल-रखुमाईच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे. यात्रेत दरवर्षी प्रमाणे मंदिर रंगीबेरंगी विद्युत दिव्यांनी झगमगून टाकण्यात आले आहे. सध्या विठू-रखुमाईचं मंदिर विद्युत रोषणाईने लखाखल आहे. पंढरीत श्रीविठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वैष्णव पंढरीत येत असतात. श्री विठ्ठल-रुक्मिणी मदिंर समितीने मंदिराला लाखो दिपमाळेची रोषणाई करुन सुशोभित करुन माऊली भत्कांच्या स्वागतास सुसज्ज केले आहे. पोर्णिमेपर्यंत अशी १५ दिवस ही रोषणाई झगमगीत राहणार आहे. सध्या मंदिरात ठिकठिकाणी आकर्षक झुंबर, क्रिपींग, झालर, लाईट डेकोरेशन लक्षवेधी ठरत आहे. मंदिराच्या समोरील बाजू, नामदेव पायरी, रूक्मिणीद्वार, पश्चिमद्वार, यासह मंदिरातील गरूड आणि हनुमान मंदिर आणि तुकाराम भवन याठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.