प्रतिनिधी, सातारा : सातारा जिल्ह्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मेडिकल कॉलेजची उभारणी सुरू असून यापुढील काळात कॉलेजचे काम मोठ्या गतीने सुरू राहील आणि या मेडिकल कॉलेजला जोकाय निधी लागेल त्याची पूर्तता करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मदतीने मेडिकल कॉलेजची गतीने उभारणी करू असा विश्वास तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्यात बोलताना व्यक्त केला आहे.
