जनतेज न्युज

सोलापुरात छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना हजारो पोस्ट कार्ड पाठवण्याचा उपक्रम

प्रतिनिधी, सोलापूर : आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सोलापुरात विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले, तसेच मानवंदना देण्यात आली.-शहरातील लोकराजा फाउंडेशनच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.फाऊंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे यांनी इतिहास अभ्यासक डॉ शिवरत्न शेटे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.-लोकराजा फाउंडेशनच्या वतीने सोलापुरात छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना हजारो पोस्ट कार्ड पाठवण्याचा उपक्रम घेण्यात आला, त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.