जनतेज न्युज

वीज कनेक्शनसाठी अर्थसहाय्य-(BWS) (फक्त झोपडपट्टी गविनी रहिवाशी आणि मागासवर्गीयासाठी )

◆कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा ल्क पावती/भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक.

◆कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळालेले वार्षिक उत्पन्न रुपये १,००,०००/- च्या आत असावे. झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समुह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा तर झोपडपट्टी व्यतिरिक्त रहात असलेल्या अर्जदारांनी मागील वर्षाचा मा. तहसिलदार , जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील दाखला जोडावा. मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक.

◆पुणे मनपाने अधिकृत झोपडीधारक म्हणून वेळोवेळी जे नियम केले असतील ते पूर्ण करणारा असावा व त्यासाठी आवश्यक ते पुरावे सादर केले पाहिजेत. दिनांक १ जानेवारी १९९५ पूर्वीचे वास्तव्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. तसेच वैयक्तिक शौचालयासाठी आवश्यक ती जागा झोपडपट्टीच्या आतमध्ये असली पाहिजे व शौचालय बांधणेसाठी आवश्यक ती परवानगी मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून मिळविणे आवश्यक राहील व ती अर्जासोबत जोडली पाहिजे.

◆अर्ज एक प्रतीत व जोडलेली कागदपत्रे एक प्रतीत टॅग लावून पाठविणे आवश्यक आहे. अटी व नियम यांत बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार म. मुख्य समाज विकास अधिकारी, समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील.

◆महानगरपालिकेचे सेवा शुल्क व इतर कर पूर्णपणे भरलेले असलेची पावती सादर करणे बंधनकारक राहील.

◆क्षेत्रीय कार्यालयाकडील प्रचलित नियमांनुसार सर्व पूर्तता करणे अर्जदारांवर बंधकारक राहील.

पुणे मनपाच्या समाज विकास विभागामार्फत अथवा झो.नि.पु. खात्यामार्फत असलेल्या सार्वजनिक स्वच्छता योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.

◆मागासवर्गीय असल्याबाबतच जातीचा दाखला आवश्यक

◆अर्जदाराने विद्युत जोड घेतल्याबाबत खात्री समाज विकास विभागामार्फत झाल्यानंतर तसेच महावितरण कंपनी कडे रक्कम भरल्याचा पावत्या सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम जास्तीत जास्त रु. ५०००/- पर्यंत अनुदान दिले जाईल.

स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे .

जर आपणास या योजनेचे फाईदे पुणे महानगरपालिका विविध योजनेचे ऑनलाइन  अर्ज करण्यासाठी अभिजीत बारवकर जनसंपर्क कार्यालय , म्हसोबा चौक , दत्तवाडी पुणे -३० येथे संपर्क साधावा.