प्रतिनिधी , सोलापूर : विजापूर वेस येथील कत्तलखान्यावर छापा टाकून कतलीसाठी आणलेल्या 15 गोवंशां ची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आणि गोरक्षकांनी संयुक्तीरित्या पार पाडली. विजापूर वेस येथील कत्तलखान्यावर कतलींसाठी गोवंश आणल्याची माहिती गो राक्षकांना मिळाली होती. त्यांनी याबाबत ची माहिती पोलीसांना दिली पोलीस आणि गोरक्षकांच्या संयुक्त कारवाईत 15 गोवंश मिळून आले आहेत. त्यांना चारा पाण्याविना कतलीसाठी डांबून ठेवल्याचे आढळले. सदर कत्तलखाना मालक आणि चालका विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर सर्व गोवंशांना अहिंसा गोशाळेमध्ये सुखरूप सोडण्यात आले आहे.
