प्रतिनिधी, उसमानाबाद : विवीध मागण्यांसाठी शिवसेनेचे आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कैलास घाडगे- पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असुन या उपोषणाचा आज द्रुसरा दिवस आहे . प्रशासनाने पाटील यांना दिलेल्या पत्रा संदर्भात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी निवासी जिल्हाधिकारी , जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी व विमा कंपनी प्रतीनीधीशी चर्चा करून मुख्य मागणी लवकर मान्य करण्याची विनंती केली . चर्चेनंतर बोलताना ते म्हणाले की सध्या कायदेशिर व सय्यमाने आंदोलन सुरू आहे . विमा कंपनी व प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तत्काळ रक्कम जमा करावी . शेतकऱ्यांचा अंत पाहु नये अन्यथा रूमने केव्हा बसेल हे सांगता येणार नाही असा इशारा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिला .
