जनतेज न्युज

विमान तिकिटे बुक करण्याचे अमिश दाखवून अनधिकृत कॉल सेंटरवर धाड

प्रतिनिधी, मुंबई : दिनांक 10 ऑगस्ट 023 रोजी कक्ष क्रमांक 8 चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मी कांत साळुंखे यांना गोपनीय माहिती मिळताच ,देश विदेशात प्रवास करणाऱ्या इच्छुक ग्राहकांना , खास करून कॅनडा देशात राहणाऱ्या नागरिकांना तसेच इतर देशात राहणाऱ्या नागरिकांना इंटरनेट च्या माध्यमातून तसेच ग्राफिक्स च्या आणि जाहिराती च्या साह्याने फसवणूक करण्यात येत होती. या मध्ये 12 इसम आणि 1 महिला सहकारी सहभागी आहे. कोणत्याही परवानगीशिवाय कॉल सेंटर चालवत असल्याचे दिसून आले. या गोष्टीचा सविस्तर पंचनामा करण्यात आला त्यात 28 लॅपटॉप व 40 मोबाईल 2 राऊटर आणि कागदपत्रे व 7,29,000 ईतकी किंमत जप्त करण्या अली .  सदर इस्माविरुद्ध 420 / 2023 कलम 419,420 465, 468,471,34 120( ब) तसेच भादवी  कलमा सह कलम 66 (क)६66 (ड) ही कलमे लावण्यात आली आहे .