जनतेज न्युज

ठाण्यात ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’सोहळ्याचे आयोजन

प्रतिनिधी, ठाणे : ओबीसी एकीकरण समिती, महाराष्ट्र, ओबीसी प्रतिष्ठान आणि मराठा सेवा संघ, ठाणे यांच्यावतीने ठाणे शहरातील कोर्ट नाका येथे ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’ हा  या सोहळ्याचं आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यात माउलींच्या पालखीचं अश्वरिंगण सोहळा पार पडला.यावेळी या सोहळ्यात ठाणेकर नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.महिला, पुरुष, मुले पारंपारिक वेशभुषेत हातात दिंड्या – पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, रस्त्यावर रांगोळीचा सडा अशा मंगलमय वातावरणात टाळ-मृदूंगाचा गजर करत वारकरी पुढे सरकत गेले