जनतेज न्युज

नदीकाठच्या गावांसाठी पुढचे 40 तास धोक्याचे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून सतर्कतेचे आवाहन

प्रतिनिधी, जळगाव : पुढच्या काही तासांमध्ये जळगाव जिल्ह्यात पर्जन्यमानाच्या दृष्टिकोनातून हवामान खात्याने रेड अलर्ट घोषित केला आहे.

त्यामुळे नदीकाठच्या गावांसाठी पुढचे 40 तास हे धोक्याचे असून नागरिकांनी आपापल्या साहित्य गुरढोर घेऊन सुरक्षित स्थळी निघून जावं असं सतर्कतेचा आवाहन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल आहे.

त्यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावं… जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे असा आवाहन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे..

नदीकाठच्या नागरिकांनी त्यांच्या ज्या वस्तू तसेच गुरे ढोरे असतील त्या  सुरक्षितस्थळी हलवाव्यात , नागरिकांनी कुठलीही भीती बाळगू नये प्रशासन प्रत्येक शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी आहे..

पुढच्या चाळीस तासात पर्यंत नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रावेर व यावल तालुक्यातील नागरिकांना केले आहे.