जनतेज न्युज

रावेर यावल तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर, रस्त्यांवरील वाहतूक बंद : जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात आज, १९ जुलै रोजी सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नदीनाले ओढ्यांना पुर येण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी नदी, नाले, ओढा काठी जाऊ नये. हतनुर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आज,१९  जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात येवून ३८८२.०० क्युमेक्स (१३७०९३ क्यूसेक) विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे.  हतनूर धरणातील विसर्गामुळे तापी नदीकाठच्या गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावातील शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार शिक्षणाधिकारी यांनी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावयाच्या आहेत. अशा सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिल्या आहेत.