जनतेज न्युज

विठुरायाच्या नामघोषाने प्रतिपंढरपूर नगरी दुमदुमली

प्रतिनिधी , औरंगाबाद : दोन वर्षानंतर भक्तगणांचा दर्शनासाठी उसळला अफाट जनसागर.आषाढी एकादशी निमित्त आज विठुरायाच्या दर्शनासाठी प्रतिपंढरपूर नगरीत विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तगणांचा अफाट जनसागर उसळलाय

कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच प्रति पंढरपूर येथे यात्रा महोत्सव भरल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांचा आनंद पांडुरंगाच्या दर्शनाने द्विगुणित झालाय

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून नावलौकिक असलेली ही दुसरी पंढरी ज्यांचे मोठ्या पंढरपूरला जाणे होत नाही अशी वारकरी मंडळी, भक्तमंडळी, आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त लाखोच्या संख्येने प्रती पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल होत असतात आज आषाढी एकादशी असल्याने सकाळपासूनच वारकऱ्यांच्या दिंड्या, तसेच डोक्‍यावर तुळशीवृंदावन घेऊन विठुरायाचा नामांचा गजर करत दर्शनासाठी येणारे लाखो भाविक भक्त प्रती पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने दाखल होत असल्याने विठू रायाची औरंगाबाद जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर नगरी भक्ती रसाच्या अफाट जनसागराने आणि विठुरायाच्या नामघोषाने नीनांदुन निघाली आहे.