प्रतिनिधी, यवतमाळ : जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांवच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले. मात्र, शेतकर्यांुच्या पदरात काहीच पडले नाही. शेतकर्यांंना तत्काळ मदत देण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने यवतमाळात बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या रॅलीत तीस बैलबंडी व दहा ट्रॅक्टरचा सहभाग होता. यवतमाळच्या मेडीकल कॉलेज चौकातून बैलबंडी मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने फिरला. या मोर्चाचे नेतृत्व काँग्र्रेसचे नेते बाळासाहेब मांगुळकर यांनी केले.
