प्रतिनिधी , नाशिक : येवला शहरासह परिसरामध्ये आपल्या लाडक्या गणरायाची जल्लोषात आगमन झाले असून शहरातील गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात आहे. स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी झांज, लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक सादर करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे स्वागत केले असून यावेळी एन्झोकेम हायस्कूलच्या गणपती स्थापनेप्रसंगीच्या मिरवणूकीत स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देखील या देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी महादेव ,गणपती बाप्पाची वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसत होते. मोठ्या उत्साहात येवल्या शहरात लाडक्या बाप्पाच्या आगमन झालेय.
